पदर सावरत आजी म्हणाली ‘सोचेंगे तुम्हे प्यार कर के नही’, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

आपण या आधी एक गाण्याचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहिले असतील. परंतू सध्या सोशल मीडियावर एका आजीचा फारच क्यूट व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक आजी आपल्या सुंदर आवाजात गाणं म्हणत आहे. आजी गाणं म्हणताना खूप गोड दिसतं आहे. आजी दिवाना या हिंदी चित्रपटातील  सोचेंगे तुम्हे प्यार कर के नही हे गाणं गात आहे.

व्हिडीओमधील आजी कोण आहेत त्या कोणत्या भागातल्या आहेत हे अद्याप कळालेले नाही. आजीने गायलेलं गाणं खूप लोकांना भावत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अनिश बेंद्रे यांनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना अनिश यांनी ‘सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं. दिवाना सिनेमातील नदीम श्रवण यांचं संगीत असलेलं श्रवणीय गाणं. या आजींच्या तोंडी ऐकाच.’ असं कॅप्शनही दिलं आहे.

हा व्हिडीओ अनेकांना आवडला असून, या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी या व्हिडीओला शेअरही केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

निष्काळजीपणा भोवला! कोरोना काळात मतदान करण्यासाठी…

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास सीटी स्कॅनची गरज नाही, अन्यथा…

अभिनेत्री अमृता खाणविलकरचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर…

वडिलांचा कोरोनाने मृत्यू; त्यानंतर मुलीनं केलेलं कृत्य ऐकून…

धक्कादायक! मेट्रो जाताना अचानक कोसळला पूल अन्, पाहा व्हायरल…