“…पण कदाचित अश्विनबद्दल बोलताना रोहितची जीभ घसरली”

नवी दिल्ली भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना भारतानं मोठ्या फरकानं जिंकला आहे. अशातच भारतीय संघाचा कर्णधार रोहितचं एक वक्तव्य आता चर्चेत आहे.

भारतीय सामना जिंकतानाच विविध विक्रम नावावर देखील केले आहेत. भारताचा आघाडीचा स्पिनर रविचंद्रन अश्विननं कपिल देव यांच्या कसोटीत सर्वाधिक दुसऱ्या क्रमाकांच्या बळीचा विक्रम मोडला आहे.

अश्विन आता अनिल कुंबळेनंतर भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या या कामगिरीबद्दल अनेकांनी स्तुतिसुमने उधळली आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं अश्विनला सर्वकालिन महान खेळाडू अशी उपमा दिली आहे. त्यानंतर वाद उद्भवला आहे. सोशल मीडियावर देखील क्रिडाप्रेमी राग व्यक्त करत आहेत.

पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी रोहित शर्माच्या या वक्तव्याबद्दल नापसंती दर्शवली आहे. शर्मानं हे वक्तव्य आपल्या खेळाडूला खूश करण्यासाठी केलं आहे, असं राशिद म्हणाला.

भारतीय खेळपट्ट्यांवर अश्विन सर्वोत्तम गोलंदाज आहे पण विदेशी धर्तीवर मला त्याच्यापेक्षा अनिल कुंबळे आणि रविंद्र जडेजा प्रभावी वाटतात, असंही राशिद म्हणाला.

अश्विन चांगला गोलंदाज आहे पण कदाचित हे बोलताना कर्णधार रोहितची जीभ घसरली असेल, असं राशिद म्हणाला. परिणामी भारतीय चाहते रशिदवर टीका करत आहेत.

दरम्यान, रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर जगातील दिग्गज फलंदाज बाद झाले आहेत. सध्या अश्विन भारताचा आघाडीचा गोलंदाज आहे. त्यामुळे आता आश्विन आणि रोहित पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

पुतीनचं टेन्शन वाढलं! अमेरिकेने रशियाविरूद्ध घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’ 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या”