टांगे भी प्रोटेक्ट हो, नहीं तो व्हायरस निचे से आ जाएगा; पाकिस्तानी मंत्र्याचं अजब वक्तव्य

इस्लामाबाद | कोरोना व्हायरसने सध्या सर्व जगभरात हैदोस घातला आहे. या महामारीला रोखण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. पण पाकिस्तानमधील मंत्री डॉ. फिरदौस आशिक यांनी अजबच सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही ट्रोल होत आहेत.

आपले शरीरच नाही तर आपले पायही सुरक्षित ठेवा. असं नाही की मी माझ्या चेहर्‍याचे रक्षण करू नका नाहीतर व्हायरस हा खालून येईल. या गोष्टी तुम्हाला एकत्र कराव्या लागतील. हे देखील एक वैद्यकीय विज्ञान आहे आणि यासाठी आपल्याला एकत्र काम केलं पाहिजे, असं डॉ. फिरदौस आशिक यांनी  म्हटलं आहे.

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी नुकताच डॉ. फिरदौस आशिक अवान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. डॉ. फिरदौस आशिक अवान इम्रान यांच्या सरकारमध्ये सूचना आणि प्रसारण मंत्री आहेत.

दरम्यान, फिरदौस यांच्या या अजब वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत असून सोशल मीडियावर त्यांच्यावर हसत आहेत. फिरदौस यांनी दिलेला हा सल्ला पुर्णपणे चुकीचा असून जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेल्या सुचनेत बसत नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-पालघर घटनेनंतर उद्धव ठाकरेंना गृहमंत्रीअमित शहांचा फोन; म्हणाले…

-पालघर हत्याकांड प्रकरणी योगी आदित्यनाथांचा मुख्यमंत्र्यानां फोन म्हणाले…

-पालघर प्रकरणी सोशल मीडियावरुन आग लावणाऱ्यांना शोधून काढणार- उद्धव ठाकरे

-“मुख्यमंत्री पदावर कोण आहे हे बघण्यापेक्षा, त्या पदाचा मान राखला पाहिजे”

-आपण काय करतो याचं भान भाजप नेत्यांनी सोडू नये; गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश