“एक हजार पाकिस्तानही लता दीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढून शकत नाही”

मुंबई | लतादिदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादिदींच्या जाण्याने देशाचा सूर हरपला आहे. जगभरात लतादीदींच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानातील अनेक नेत्यांनी राजकीय नेत्यांनी देखील लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. लतादीदींच्या निधनाबद्दल पाकिस्तानातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, मोहम्मद हाफीज, वकार युनूस, पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर बाजवा यांचे वैयक्तिक सल्लागार असल्याचा दावा करणाऱ्या ‘झैदू’ नावाच्या ट्विटर युजरने म्हटलं की, एक हजार पाकिस्तानही लतादीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढू शकत नाहीत.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही ट्वीट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली केली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय उपखंडाने एक महान जगप्रसिद्ध गायिका गमावली आहेसं ट्वी, अट इम्रान खान यांनी केलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत इम्रान खान आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, ‘लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय उपखंडाने एक महान जगप्रसिद्ध गायिका गमावली आहे. त्यांची गाणी ऐकून जगभरातील अनेक लोकांना आनंद मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

शाहरूखला ट्रोल करणाऱ्यांना ऊर्मिला मार्तोंडकरने सुनावलं, मोदींचा ‘तो’ फोटो केला शेअर 

दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी; सुप्रिया-शरद पवारांचा हा फोटो ‘का’ होतोय व्हायरल? 

लता मंगेशकरांना विष देऊन मारायचा प्रयत्न झालेला?, नेमका काय प्रकार घडला होता? 

‘तो’ एक निर्णय, वाद आणि अनेक वर्ष अबोला; ‘या’ कारणामुळे लतादीदी-आशाताईंमध्ये आलेला दुरावा 

लग्न झालेलं नसतानाही लतादीदी लावत होत्या सिंदूर; सांगितलं होतं ‘हे’ खरं कारण!