कोरोनाच्या लढ्यात विठूरायाही आला मदतीला; विठ्ठल मंदिराकडून 1 कोटींची मदत

पंढरपूर |  संपूर्ण जगावर कोरोनाचं आरिष्ट आलेलं आहे. भारतात तसंच महाराष्ट्रात कोरोनचा दिवसागणिक वाढणारा आकडा चिंतेचा विषय ठरतो आहे. या दिवसागणिक वाढणाऱ्या संकटात राज्यभरातली संस्थानं मदतीचा हात पुढे करू लागली आहेत. पंढरीचा विठूराया हा खरं म्हणजे, गरीब, कष्टकरी, माळकरी, वारकऱ्यांचा देव. पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने 1 कोटींची मदत जाहीर केली आहे.

पंढरपूर विठ्ठल मंदिराने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींची मदत दिली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनिल जोशी यांनी ही माहिती दिली आहे.

एप्रिल महिन्यात असलेली चैत्री यात्रा देखील रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच मंदिर प्रशासनाने घेतला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तसंच कोरोनाचं संकट जाईपर्यंत तसंच शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत विठ्ठल मंदिर भक्तांसाठी बंद राहणार असल्याचा पुनरूच्चार देखील त्यांनी केला.

दरम्यान, कोरोनाच्या लढाईत राज्यातल्या विविध मंदिर प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. तुळाजपुरचं तुळजाभवानी मंदिर प्रशासन, कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिर प्रशासन, शिर्डीच्या साईबाबा मंदिर प्रशासन तसंच शेगावचं गजानन महाराज मंदिर प्रशासन यांनी तर मुंबईतल्या सिद्धीविनायक गणपती मंदिर प्रशासन तसंच लालबाग गणेश मंडळाने मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकत मदतीची घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-कोटक बँकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 कोटींची घसघशीत मदत

-कॉंग्रेसचे आमदार-खासदार कोरोनाच्या लढाईसाठी देणार एका महिन्याचं वेतन

-नवउद्योजकांना आपल्या व्यवसायासाठी फंडिंग मिळवण्याची मोठी संधी!

-संकटाच्या काळात राजदेखील मला फोन करतोय- उद्धव ठाकरे

-श्रीमंत मनाचा बळीराजा; 3 एकर जमिनीपैकी 1 एकर गहू गरजूंसाठी देणार