जानकरसाहेब… तुम्ही लग्न करू नका पण रासपच्याच चिन्हावर लढा!- पंकजा मुंडे

बीड | महादेव जानकरांनी शपथ घेतली आणि खोटी धमकी पण देऊन टाकली. जानकरसाहेब… तुम्ही लग्न करू नका पण रासपच्याच चिन्हावर लढा!, असा सल्ला महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांना दिला आहे. 

काहीही झालं तरी रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार, असा इशारा महादेव जानकर यांनी भाजपला दिला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी गमतीशीर उत्तर देत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर या भावा बहिणीचं नातं सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे. बहिणीने दिलेला हा प्रेमाचा सल्ला सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

दरम्यान, येत्या निवडणुकीत महादेव जानकर कुठल्या चिन्हावर निवडणुक लढवतात, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-