“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”

बीड |   भाजप नेते आणि दिवंगत केंद्रिय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजी स्मृतीदिन असतो. या निमित्ताने त्यांचे समर्थक गोपीनाथगडावर जमत असतात. परंतू यावेळी या स्मृतीदिनाव कोरोनाचं संकट असल्याने पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत गडावर जमू नका, असं सांगितलंय. तर साहेबांच्या स्मृतीदिनाला समाजकार्य करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्याला दिला आहे. याचनिमित्ताने पंकजा मुंडे यांची एक भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे.

“3 जून तसं मी या दिवसाची वाट अजिबात पाहत नाही. अगदी 2 जून 2014 ला जाऊन थांबावं असं वाटतं. 2 जूनला आनंद, उत्साह, समाधान होतं. बाबा पोटभर रस पोळी खाऊन गेले होते. तेच अखेरचं जेवणं त्यांचं स्वत:च्या घरी….मग पार्थिवदेखील घऱी आणता आलं नाही…म्हणून 3 जून उजाडलाच नाही पाहिजे असं वाटतं.

तसं 3 जूनचा दिवस संघर्ष दिन म्हणून आपण साजरा करतो. गोपीनाथ गड माणसांनी तुडुंब भरलेला असता. पण यावेळी संघर्ष वेगळा आहे. सर्वांनी करोनामुळे काळजी आणि लॉकडाउनच्या नियमांचं पालन करायचं आहे, ही माझी विनंती आहे. यावर्षी कोणीही गर्दी करायची नाही. दर्शनासाठी नाही आणि मला भेटण्यासाठी देखील नाही

3 जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहा. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, तो काय हे मी सांगायची गरज नाही. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा”.

 

महत्वाच्या बातम्या-

-मी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प

-…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड

-राज्यातील सर्व जनतेला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ, असा निर्णय घेणारं देशातील एकमेव राज्य

-राज्यात आतापर्यंत 59 लाख क्विंटल अन्नधान्य तर 29 लाख शिवभोजन थाळ्यांचं वाटप

-लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार?, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास