“…नंतर आमचा नाद करा”; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना खुलं आव्हान

मुंबई | राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार वाद पेटला आहे. मुंबई पोलीसांकडून मुद्दाम त्रास दिला जात असल्याची तक्रार विरोधक करत आहेत.

सभागृहात बीड जिल्ह्यातील अवैध व्यवहारांचा मुद्दा गाजला होता. बीड पोलीस अधिक्षकांना रजेवर पाठवण्याची नामुष्की सरकारवर आली होती.

बीडनंतर आता सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अशातच आता परत एकदा मुंडे बहिण-भावातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

बीड जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीवरून बीडच्या खासदार प्रितम मुंडेंनी धनंजय मुंडेंना घेरलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडेंनी प्रितम मुंडेंना उत्तर दिलं होतं.

प्रितम मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वादात आता भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी उडी घेतली आहे. पंकजांनी धनंजय मुंडेवर जोरदार निशाणा साधला आहे.

तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वाॅलपासून, सेशन कोर्ट, सर्वोच्च न्यायालय ते ईडीपर्यंत जगजाहीर आहेत. बाकी स्वपक्षातील आमदारांच्या सुचनांकडं आधी लक्ष द्या, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

सभागृहात आमदारांनी जी मागणी केली आहे त्यावर बोला नंतर आमचा नाद करा, असं खुलं आव्हान पंकजांनी धनंजय मुंडेंना दिलं आहे.

दरम्यान, राज्यात सर्वात जास्त प्रमाणात राजकीय जुगलबंदी सध्या बीड जिल्ह्यात रंगली आहे. महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  नवाब मलिकांना दिलासा नाहीच; मुंबई उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय 

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

  मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

  ‘तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?’; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

  ‘काॅंग्रेस मूर्खांच्या नंदनवनात रमलीय’; ‘या’ काॅंग्रेस नेत्याचा हल्लाबोल