गुडन्यूज… भारतात कोरोनावरच्या या औषधाला परवानगी, औषध गेमचेंजर ठरण्याची शक्यता!

मुंबई | भारतात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आता रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादनासाठी सिप्ला आणि हेट्रो या दोन भारतीय कंपन्यांना भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून परवानगी मिळाली आहे. हेटरो कंपनीने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे.

मुंबई महानगरपालिकेला पहिले एक हजार इंजेक्शन मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच शहरातील रूग्णांसाठी हे प्रभावी औषध उपलब्ध होणार आहे.

भारतातील कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणं पाहता कोविफॉर हे औषध गेम चेंजर ठरू शकतं. कारण याचे क्लिनिक परिणाम सकारात्मक आहेत. देशभरातील रुग्णांपर्यंत हे औषध पोहोचवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं हेटरो ग्रुपचे चेअरमन डॉ. डी बी पार्था रेड्डी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या आधाी फॅबिफ्लू या गोळीच्या उत्पादनाला परवानगी देण्यात आली आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या मुंबईतल्या औषध निर्मात्या कंपनीला कोरोनावर उपचारासाठी गोळी तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ही परवानगी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला, आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला आणि पडला”

-आर्मीवर अविश्वास दाखवू नका म्हणण्यापेक्षा….; कमल हसन यांचं मोदींवर टीकास्त्र

-MPSC निकालात मराठा समाजातील मुलांची संख्या बघून समाधान आणि आनंद वाटला- छत्रपती संभाजीराजे

-‘या’ कारणाने सुशांतला ते ३ सिनेमे करता आले नाहीत, पोलिसांचा वेगात तपास सुरु

-जागतिक आरोग्य संघटनेचा दिलाय हा इशारा; जग आता मोठ्या संकटात!