पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 18 रुपये तर डिझेलच्या 12 रुपयांची वाढ

नवी दिल्ली | केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी वाढ केली आहे. पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात प्रति लिटर 18 रुपयांची तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 12 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मोदी सरकारने मार्च महिन्यात दुसऱ्यांदा इंधनाच्या उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे इंधनाचा भडका उडणार आहे. इंधनाची किंमत वाढल्याने याचा भार सर्व सामान्यांच्या खिशावर पडणार आहे.

कच्चा तेलाच्या किमती 30 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास कायम राहिल आणि सरकारने एक्साईज ड्यूटीत कोणतीही वाढ न केल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती जवळपास 10 ते 12 रुपये प्रति लिटर कमी होऊ शकते, असा अंदाज माध्यमांमध्ये आलेल्या अहवालात वर्तवण्यात आला होता.

दरम्यान, सरकारने एक्साईज ड्यूटी वाढवल्याने इंधन दर कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. आधीच कोलमडलेल्या आर्थिक स्थितीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळेच आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी सरकारने ही वाढ केल्याचं बोललं जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-मध्य प्रदेशात सत्तापालट; शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रिपदी विराजमान

-सावधान… कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली 97 वर; नागरिकांनो आता तरी घराबाहेर पडू नका

-“आता रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गय करणार नाही… सगळं तुमच्यासाठीच चाललंय एवढंही कळू नये”

-“आत्ताच्या परिस्थितीत घरी राहणं हेच देशासाठी मोठं योगदान”

-जिथून कोरोनाची सुरुवात झाली तिथून आली आनंदाची बातमी