सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भडका; आजचा दर जाणून घ्या…

दिल्ली | देशभरात डिझेल व पॅट्रोलच्या दराचा चांगलाच भडका उडाला आहे. आज सलग २० व्या दिवशी इंधनवाढीच्या दरात वाढ होताना नागरिकांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री बसली आहे. एका दिवसात डिझेल १७ तर पॅट्रोल २१ पैशांनी महाग झालं आहे.

राजधानी दिल्लीतील इंधनवाढीत डिझेलचे दर तर पॅट्रोलपेक्षा जास्त वधारल्याचं पहायला मिळालं. मुंबईचा विचार करायचा झाल्यास आज शहरात प्रतिलीटर पॅट्रोल ८६.९१ रूपये तर डिझेलसाठी ७८.५१ रूपये मोजावे लागणार आहेत.

दुसरीकडे गेल्या १५ दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती जशाच्या तशा आहेत. त्या प्रतिबॅरल ३५ ते ४० डॉलरच्या दरम्यान आहेत, मात्र देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

जानकारांच्या मते, तेल कंपन्यांनी मागच्या १९ दिवसात दिवसात पेट्रोलची ८.६४ किंमत इतक्या रुपयांनी वाढवली आहे तर डिझेलच्या किमतीत रेकॉर्डब्रेक १०.४१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

-राहुल गांधींनी पुन्हा काँग्रेसचं नेतृत्व करावं, पक्षातील ‘या’ नेत्याची मागणी

-कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी शासनाकडून ‘एवढा’ निधी मंजूर