Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा काय आहेत दर

मुंबई | पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात.

देशांमधील तणाव वाढल्यामुळे सध्या पेट्रोल डिझेलवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे इंधन दरात चढउतार होत असेलेली पहायला मिळत आहे.

पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार देशात आज देखील इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे नागरिकांनी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये काहीशी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं किमतींमध्ये होणाऱ्या चढ-उतारांमध्ये देशातील किमती मात्र स्थिर आहेत.

6 एप्रिलपर्यंत इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत होती. तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि मुंबईत 120.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत सध्या प्रति बॅरल 106 डॉलरच्या आसपास आहे. त्याच्या किमती वाढल्या तर कंपन्या पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करू शकतात.

पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी ! भायखळा तुरुंगात रवानगी होताच नवनीत राणा यांची प्रकृती खालावली

बाॅयफ्रेंडनं चोरला गर्लफ्रेंडचा मोबाईल; मग जे काही झालं ते तुम्हीच व्हि़डीओमध्ये बघा…

कॅप्टन कूल KL Rahul चा धमाका; मुंबई इंडियन्सविरूद्ध दमदार शतक ठोकलं

WHO च्या दाव्याने जगाचं टेन्शन वाढलं; लहान मुलांमध्ये आढळली ‘हिपॅटायटीस’ची प्रकरणे

फायर चंद्रभागा आजींची उद्धव ठाकरेंनी सहकुटूंब घेतली भेट; दिलं ‘हे’ खास गिफ्ट