मुंबई | जागतिक बाजार पेठेतखनिज तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा पेट्रोलियम कंपन्यांना होणार आहे. खनिज तेलातील स्वस्ताई आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यास पेट्रोल आणि डिझेल 5 ते 6 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खनिज तेलातील स्वस्ताई आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यास मुंबईत पेट्रोलचा भाव 70 रुपयांखाली येऊ शकतो. ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब असेल.
जागतिक बाजरपेठला खनिज तेलाचा पुरवठा करणारे ओपेक देश, रशिया आणि सौदी अरेबिया या तिघांमध्ये खनिज तेलाच्या उत्पादनावरून वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे सोमवारी खनिज तेलाचा भाव तब्बल 30टक्क्यांनी कोसळला होता.
खनिज तेल 35 डॉलर प्रती बॅरल एवढ्या नीचांकी पातळीवर आले आहे. या घसरणीचे भारतात तात्काळ परिणाम दिसून आले नसले तरी येत्या काही दिवसांत कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; खा. डॉ. अमोल कोल्हेंची संसदेत मागणी
-शाळा बंद पण दहावी-बारावी बोर्डाचे पेपर मात्र ठरलेल्या वेळेतच मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
-कोरोना व्हायरसने उडवली क्रिकेटची दांडी; भारत-आफ्रिका वनडे मालिका केली रद्द
पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा चढता क्रम; पुणेकरांमध्ये भितीच वातावरण
तुमच्या डोक्यात लोकप्रियतेची हवा घुसलेय, निलेश साबळे माफी मागा; संभाजीराजें आक्रमक