भारताकडे डोळे वर करुन पाहाल तर तुमचे डोळे काढून घेण्याची ताकद आमच्यामध्ये- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. भारताकडे डोळे वर करुन पाहाल तर तुमचे डोळे काढून घेण्याची ताकद आमच्या सैन्यामध्ये असल्याचा इशारा त्यांनी आपल्या संबोधनातून चीनला दिला आहे.

गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याने चीनला रोखठोक प्रत्युत्तर दिलं असल्याचं मोदी म्हणाले. तसंच गलवान खोऱ्यातील भारत-चीन संर्षादरम्यान शहीद जवानांना देखील यावेळी मोदींनी आदरांजली वाहिली.

जे जवान शहीद झाले आहेत त्याबद्दल संपूर्ण देशाला अतीव दुःख आहे. मात्र ज्या कुटुंबातले जवान शहीद झाले त्यांनीही घरातल्या दुसऱ्या मुलांना सैन्यातच भरती करणार असं म्हटलं आहे. शहीदांच्या कुटुंबांबद्दल देशाला अभिमान आणि गर्व आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, अम्फान, निसर्ग यासारखी चक्रीवादळं येऊन गेली. शेजारी देश कुरापती काढतो आहे. तरीही आपण सगळ्या संकटांना तोंड देतो आहोत, असंही मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे

-पुणे विभागात सलून सुरु करण्यास परवानगी; ‘या’ नियमांचं पालन करणं बंधनकारक

-सुशांतच्या आत्महत्येनंतर झालेल्या ट्रोलिंगनंतर आता करण जोहरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-‘ही राजकारणाची वेळ नाही’; शरद पवारांचा काँग्रेसला टोला

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नगरसेवकाने गोपीचंद पडळकरांना बाईकवरुन शहरभर फिरवलं