कोरोनावर उपाय सुचवा आणि जिंका बक्षिस…; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर कोरोनावर नाविण्यपूर्ण उपाय सूचवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी केंद्र सरकारकडून अशी स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या स्पर्धेत जिंकणाऱ्यांना 1 लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये एक लिंक शेअर केली आहे. ही लिंक थेट या स्पर्धेच्या पेजवर घेऊन जाते. हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं अधिकृत पेज आहे.

कोरोना देशात प्रचंड वेगावे वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतपरी मेहनत घेताना दिसत आहे. सरकारकडून नागरिकांना खबरदारीचं आवाहन केलं जात आहे.

दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अखेर मोदींनी उपाययोजना सुचवण्याचं आवाहन केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-तुला मला का भेटायचं होतं?; राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीने घेतली पप्पी पाहा व्हिडीओ

-कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नाही पण… मुखमंत्र्यांचं जनतेला आवाहन

-तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भविकांना करावी लागणार 31 मार्चपर्यंत प्रतिक्षा

-“कोरोना व्हायरस म्हणजे अल्लाहने चीनला दिलेली शिक्षा आहे.”

-उद्धव ठाकरेंनी का बरं राजीनामा द्यावा? तृप्ती देसाईंचा चंद्रकांत पाटलांना सवाल