…म्हणून महामोर्चाआधी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा!

मुंबई |  मनसेचा 9 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात महामोर्चा पार पडत आहेत. पण त्यापूर्वीच मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा पाठवल्या आहेत. मनसेच्या चौक सभांमधून कोणतंही गैरकृत्य किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल, असं पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीत म्हटलं आहे.

अजेंडा आणि झेंडा बदलल्यानंतर मनसेने आपला कार्यक्रम कृतीत उतरवण्यासाठी 9 तारखेला पाकिस्तानी आणि बांगलादेशी धुसखोरांविरोधात मोठा मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. त्याचीच तयारी मनसे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या जोमात करत आहेत. त्याचीच वातावरण निर्मिती म्हणून मनसे चौकसभांचं आयोजन करत आहे.

लालबाग परळ, काळाचौकी परिसरामध्ये मनसेने चौकसभांचं आयोजन केलं होतं. या चौकसभांमधून जास्तीत जास्त लोकांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मनसेतर्फे केलं जात आहे. मात्र याच काळात काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरण्यास येईल, अशा नोटीसा पोलिसांनी बजावल्या आहेत.

काळाचौकी इथले मनसे शाखाध्यक्ष राजेश मोरे यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. कलम 149 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे.

दुसरीकडे, आम्ही चौकसभा घेतो आहोत, अशी कल्पना आम्ही पोलिसांना दिली आहे. तरीसुद्धा अश्या प्रकारच्या नोटीसा पोलिस देत असतील तर ते चुकीचं आहे, अशी नाराजी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बोलून दाखवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदी पाठीवर दंडे खातील पण तरूणांना रोजगार देणार नाहीत- नितीन राऊत

-महाराष्ट्राला झालंय तरी काय?? अभिनेत्री मानसी नाईकची तरूणांकडून छेडछाड

-….म्हणून रोहित पवारांना तरूणाने मागितली आत्महत्या करण्याची परवानगी!

-चंद्रपुरात पोलिसांची लॉजवर धाड; 13 कॉलेज जोडपी ताब्यात

-कामं होत नसली की फक्त बहाणे सांगायचे; फडणवीसांची अजित पवारांवर टीका