“मुंबई-महाराष्ट्रात बेड्सची पुरेशी संख्या, कोरोनाचा सामना करण्यास ठाकरे सरकार खंबीर”

मुंबई |  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रिय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मुंबई आणि महाराष्ट्रच्या कोरोना परिस्थितीवर इंडिया टीव्हीशी बोलताना सविस्तर भाष्य केलं. यावेळी महाराष्ट्रातली परिस्थिती ठाकरे सरकारने अगदी व्यवस्थित हाताळल्याचं सांगत मुंबई-महाराष्ट्रात रूग्णालयांमध्ये पुरेशी जागा आहे, असा दावा त्यांनी केला.

देशात महाराष्ट्रात जरी सर्वाधिक रूग्ण असतील तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आम्ही महाराष्ट्रात चाचण्याचं प्रमाण वाढवलं आहे किंबहुना देशात सर्वाधिक चाचण्या या महाराष्ट्रात होत आहेत, असं पटेल म्हणाले.

मुंबईसह महाराष्ट्रात 28 हजार रूग्ण आतापर्यंतबरे झाले आहेत. गंभीर अवस्थेतेतील रुग्ण कमी आहेत. तसंच अ‌ॅक्टीव्ह केसेस देखील दिवसेंदिवस कमी-कमी होत आहेत. एकंदरित उद्धव ठाकरे सरकारने परिस्थितीत व्यवस्थित हाताळली आहे, असं पटेल यांनी नमूद केलं. तसंच महाराष्ट्र सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने प्रारंभापासूनच परप्रांतीयांना त्यांच्या गावाकडे जाण्याची सुविधा दिली असती तर अधिक चांगलं झालं असतं. त्यांचे दरम्यानच्या काळात जे हाल झाले ते हाल झाले नसते. महाराष्ट्र सरकारने अल्पावधीत चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. दोष देण्याची किंवा आरोप प्रत्यारोप करण्याची ही योग्य वेळ नाही, असंही सांगायला पटेल विसरले नाहीत.

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-रूग्णांना दिलासा देण्यासाठी पीपीई कीट घालून मंत्री यशोमती ठाकूर थेट कोविड वॉर्डात!

-शिवसेनेचे सोशल मीडियावर पेड ट्रोलर आहेत; फडणवीसांचा दावा

-ठाकरे सरकारची ‘मराठी ललकार’… सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य

-पृथ्वीबाबांचा मोदी अन् ठाकरे सरकारला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला…

-पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार पण…