“आर्थिक अपयश झाकण्यासाठी धार्मिक झगडे लावण्याचा सरकारचा डाव”

मुंबई | आर्थिक अपयश झाकण्यासाठी धार्मिक झगडे लावण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच संसदेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून विरोध केला आहे.

बेरोजगारी ही सध्या देशापुढील सगळ्यात मोठी समस्या आहे, यातून मार्ग काढण्यात सरकार अपयशी ठरत आहे. तसेच आर्थिक प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी भाजप सरकारवर केला आहे.

संविधानाचा ढाचा उद्ध्वस्त करण्याचं काम भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ करत आहे. संविधानाने दिलेल्या समतेच्या तत्वाची पायमल्ली करुन नागरिकांमध्ये धार्मिक भेदभाव करणाऱ्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला माझा विरोध आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान, कायद्यात नैसर्गिक नागरिकत्व देण्याची तरतूद आहे, त्यामध्ये कुठेही धर्मा चा उल्लेख नव्हता.पण आजच्या विधेयकात धर्माचा उल्लेख आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –