“उद्धव ठाकरे केवळ नावाला मुख्यमंत्री, कर्तृत्वाने नाहीत”

मुंबई | राज्याच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा भार अविरतपणे वाहणारी सर्वांच्या जिव्हाळ्याची लालपरी सध्या संपाच्या गर्तेत अडकली आहे. परिणामी सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या तब्बल सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये वेळोवेळी झालेल्या बैठकीनंतरही पुर्ण क्षमतेनं एसटी वाहतुक सुरू होत नाहीये.

राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही, असं विरोधक म्हणत आहेत. परिणामी राज्यात एसटी संपावरून राजकारण पेटलं आहे. भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

भाजपनंतर आता वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून आंबेडकर आक्रमक झाले आहेत.

उपटसुंभ कामगार नेत्यांच्या मागं लागल्यानं एसटी कामगारांना आज त्रासाला सामोर जावं लागत आहे. एसटी कामगारांची फसगत झाली आहे, असं आंबेडकर म्हणाले आहेत.

दोन वेळा एसटी कामगारांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास पाठवण्यात आलं. पण उद्धव ठाकरे हे नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वानं नाही, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.

एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावाच लागेल. ठाकरे सरकार हे चोर आणि लुटारूंचे सरकार आहे, अशी घणाघाती टीका आंबेडकरांनी केली आहे.

दरम्यान, एसटी विलिनीकरणाबाबत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत संप मागं घेणार नाही, अशी आग्रही भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पुतीनचं टेन्शन वाढलं! अमेरिकेने रशियाविरूद्ध घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’ 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या”