केजरीवाल दहशतवादी असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत- प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली | दिल्लीमधील विधानसभेची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतसं नेत्यांमधील शाब्दिक युद्ध रंगत चाललं आहे. अशातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दहशतवादीच असल्याचे पुरेसे पुरावे आमच्याकडे उपलब्ध असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

केजरीवाल आज निरपराध चेहऱ्याने फिरत आहेत. आपण दहशतवादी आहोत का, अशी विचारणाही ते करत आहेत. मात्र ते खरोखरच दहशतवादी आहेत. हे सिद्ध करणारे भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. आपण अराजवादी आणि दहशतवादी असल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं होतं, असं जावडेकर म्हणाले.

आसामचे भारतापासून विभाजन करणे, स्वातंत्र्याबाबतची जिनांची कल्पना, जिथून भारताला विभाजित करण्याच्या घोषणा दिल्या जातात, त्यांचे समर्थन करणे म्हणजे देखील दहशतवादच आहे, असंही जावडेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने शाहिन बागेतील आंदोलनाचे समर्थन करण्यावरही जावडेकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थि केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘इमोशन क्वीन’ मानसी नाईकला मिळाला लाईफ पार्टनर; दिली प्रेमाची कबुली

-ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्यांना कसं जागं करणार; फडणवीसांची टीका

-जामिया आणि शाहीनबागेतील आंदोलनं म्हणजे देशाच्या सौहार्दाला बाधा- नरेंद्र मोदी

-उद्धव ठाकरेंना शब्द दिला तर तो पाळायला पाहिजे पण…- सुधीर मुनगंटीवार

-मुनगंटीवारांची पुन्हा शिवसेनेला प्रेमाची हाक; ‘तू यार है किसी और का’ म्हणत सेनेला प्रस्ताव