“रोशनी देती हूँ, लेकीन दुसरो को जला भी सकती हूँ”

सोलापूर | अखेर महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर झालं आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक नेते नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेही नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खातेवाटपानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मै वो शमा हूँ, जो रोशनी मे खेलती हूँ, अपनो के लिये रोशनी देती हूँ, लेकीन दुसरो को जला भी सकती हूँ, या शायरीच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी रविवारी काँग्रेस भवन मध्ये येऊन कार्यकर्त्याशी संवाद साधला.

पंधरा दिवस सहकार्य केलं त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार. या ठिकाणी आल्यावर मला नेहमीच धीर मिळत आला आहे. काँग्रेस के घर मे देर है, अंधेर नही, असंही शिंदे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात प्रणिती शिंदे यांना स्थान न मिळाल्यानं त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-