राज ठाकरेंनी हिंदुत्ववादाचा वसा घेतल्यामुळे शिवसेना अस्वस्थ- प्रवीण दरेकर

मुंबई | पाकिस्तानी, बांग्लादेशी घुसखोरांना हाकलण्याची मागणी करत मनसेने गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान महामोर्चाचं आयोजन केलं आहे. मात्र हा मोर्चा भाजप पुरस्कृत आहे अशी टीका शिवसेनेने केली होती. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेची स्पेस मनसे भरुन काढत आहे. राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ झाली आहे. त्यामुळेच शिवसेनेकडून अशाप्रकारची टीका होत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

देशाच्या व्यवस्थेवर घुसखोरांचा ताण असल्याने जो कोणी देशभक्त आहे ते मनसेच्या मोर्चात सहभागी होऊ शकतात. बाळासाहेब ठाकरेंनी जी आक्रमक भूमिका पाकिस्तानी, बांगलादेशीविरोधात घेतली होती. मात्र सत्तेच्या हवास्यापोटी शिवसेनेने सोयीस्कररित्या ही भूमिका बाजूला सारली असल्याचंही दरेकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सीएए कायद्याचं समर्थन सर्वांनीच करायला हवं. मनसेचा मोर्चा पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरोधात आहे. त्यामुळेच त्याचं स्वागत केलं पाहिजे. शिवसेनेनेही सीएए कायद्याचं समर्थन करावं, असं मत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“मनसेच्या मोर्चामागे भाजपचाच हात”

-राज ठाकरेंवरील प्रेमापोटी दिव्यांग आजोबांनी नगरहून थेट गाठली मुंबई!

-“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही”

-“थोड्या दिवसांनी अजित पवारच शिवसेना चालवताना दिसतील”

-मी नाराज नाही; मी माझे मुद्दे मुख्यमंत्र्याकडे मांडले आहेत- तानाजी सावंत