“सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही अन् उगाच…”; भाजप नेत्याची नानांवर टीका

मुंबई | राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यांवरून जोरदार वाद वाढला आहे. अशातच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून जोरदार वाद झाला आहे.

भंडारा आणि गोंदियामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसनं भाजपला सोबत गेत सत्ता स्थापन केल्यानं राज्यात मोठी खळबळ माजली आहे. परिणामी भाजप नेत्यांनी आता टीका करायला सुरूवात केली आहे.

नाना पटोलेंनी भाजपवर आणि राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नानांवर जोरदार टीका केली.

नाना पटोले फक्त आरोप करू शकतात त्याच्या पलिकडं नाना पटोले हे काहीच करू शकत नाही, असा टोला दरेकर यांनी नानांना लगावला आहे.

सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत त्यांच्यात नाहीयं, फक्त तोंडाच्या वाफा सोडण्याचं काम नाना पटोले करतात, अशी जहरी टीका दरेकरांनी केली आहे.

महाविकास आघाडीतील अंतर्गत वादावर बोलताना दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोले लगावले आहेत. हे सत्तेत राहातात, गद्दारी केली म्हणतात, हे नेते काहीही करू शकतात, असं दरेकर म्हणाले आहेत.

राजद्रोहाच्या खटल्यावर महाविकास आघाडी आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर योग्यरित्या कारवाई करेल, अशी अपेक्षा दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यात मनसे कार्यकर्त्यांची चालू असलेली धरपकड ही योग्य नसल्याचं वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे. मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांंनी नोटीसा बजावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “राज साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”

सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित 

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर 

“सुदैव आहे तुमचं की तुम्हाला तुरूंगात दणके बसले नाहीत, तुम्ही त्यातच खुशी माना” 

मोठी बातमी! नवाब मलिक प्रकरणी एनआयएच्या तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा