वजन कमी करण्यासाठी चक्क मांजर करतीय एक्सरसाईज, पाहा व्हायरल व्हिडीओ

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूने शरिरात प्रवेश केल्यानंतर त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. गेल्या वर्षभरापासून अनेक लोकांना आपले आरोग्य, रोगप्रतिकार शक्ती मजबूत नसल्यामुळे कोरोनाकाळात त्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत.

कोरोना विषाणामुळे सर्वांना आपल्या आरोग्याचं महत्व समजायला लागलं आहे. प्रत्येकजण आता स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊ लागला आहे.

त्याचप्रमाणे आज काल या बदलत्या लाईफ स्टाईलमुळे आपले राहणीमान यासोबतच आपला आहारही बदलत चालला आहे. फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या अशाप्रकारच्या लाईफ स्टाईलचा अनेकांच्या शरिरावर परिणाम झालेला पाहायला मिळतो.

फास्ट फूड, बाहेरचे तेळकट अन्नामध्ये अधिक प्रमाण कॅलरिज असतात. त्यामुळे आपल्या शरिराची चरबी वाढण्यास सुरूवात होऊन, हळू-हळू आपले वजन वाढते. परंतू आजकाल सर्वांना आर्कषक दिसायचे असते. तसेच सर्वांना आपली फिगर मेन्टेन ठेवायची असते. त्यासाठी महिला, पुरूष दिवस-रात्र खूप कष्ट घेतानाही आपण पाहतो.

सोशल मीडियावर आपण या कोरोनाकाळात अनेक एक्सरसाईज करतानाचे व्हिडीओ पाहिले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींचाही यात समावेश होता. अशातच एक्सरसाईज करतानाचा एक मजेशीर व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिला नाही पुरूष नाही बालकही नाही. चक्क मांजर एक्सरसाईज करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वजन वाढले असल्यामुळे एक्सरसाईज करत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये एक मांजर रस्त्यावरील फुटपातवर असलेल्या झाडाचा आधार घेत एक्सरसाईज करत आहे. ती त्या झाड्याच्या आधारे सीटप्स करण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘Trying to build his body, When we all are after antibody’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच आतापर्यंत हा व्हिडीओ सात हजार लोकांनी पाहिला असून, अनेकांनी हा व्हिडीओ पाहून या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘लव यू जिंदगी’ म्हणणाऱ्या तरुणीचा कोरोनाशी लढा…

साप पकडताना अचानक शिरला साप लुंगीमध्ये अन्…, पाहा…

वादळी वाऱ्याने चीनचा काचेचा पूल तुटला; 330 फूट उंचावर लटकच…

चक्क पिंजऱ्यात लॉक केलं डोक; मात्र चावी बायकोच्या हातात,…

चक्क पाण्याऐवजी आकाशातून पडतोय उंद्रांचा पाऊस, पाहा व्हायरल…