बजेट सादर करताना बऱ्याच त्रुटी होत्या- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई |  आज महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केला. देशात सध्या आर्थिकमंदी सदृश्य परिस्थिती आहे. परंतु केंद्र सरकार काहीच संकट नाही असं वागतंय आणि महाराष्ट्र सरकारनेही ते मान्य करुन आजचा अर्थसंकल्प सादर केला परंतु हा अर्थसंकल्प सादर करत असताना त्रुटी होत्या, असं मत काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडल.

आजच्या घडीला देशात आर्थिक महामंदी, सामाजिक अस्थिरता आणि कोरोना वायरस या सर्वांच्या कचाट्यात देशाची अर्थव्यवस्था सापडलेली आहे आणि त्यातुन महाराष्ट्रही सुटलेला नाही. महाराष्ट्राला केंद्राकडून जीएसटीच्या रुपाने जी रक्कम मिळत होती ती कमी कमीच होत आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना काही मर्यादा होत्या.तरीसुद्धा या अर्थसंकल्पामध्ये सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सरकारने केलेला आहे, असं ते म्हणाले.

तसंच अपुर्ण सिंचन प्रकल्पांसाठी दहा हजार कोटींची तरतुद, पायाभुत सुविधांमध्ये पुणे रींगरोड, परिवहन, आरोग्य तसंच कोकणचा सागरी महामार्ग हे महत्वाचे प्रकल्प आहेत. तर अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे दहा लाख सुशिक्षित बेरोजगारांना अ‌ॅपरांटीस ट्रेनिंगकरता सहा हजार कोटींची तरतुद केलेली आहे, असंही चव्हाणांनी सांगितलं.

चव्हाणांनी अर्थसंकल्प सादर करताना काय त्रुटी होत्या हे सांगितलं तर दुसरीकडे “हा अर्थसंकल्प नसुन हे जाहीर सभेतील भाषण होत, ज्यासाठी अर्थसंकल्प सादर करतात तेच या अर्थसंकल्पामध्ये नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

धोनी इज बॅक…. चेन्नईच्या मैदानात लागोपाठ लगावले 5 गगनचुंबी षटकार!!! पाहा व्हीडिओ

विकासाचा रूतलेला गाडा अर्थसंकल्पाने पुन्हा प्रगतीपथावर येईल- काँग्रेस

-ऐस बँकेच्या खातेदारांना दिलासा; स्टेट बँक खरेदी करणार मोठा हिस्सा

-पर्यटन खात्याला अजित पवारांनी दिला भरघोस निधी; त्यावर आदित्य ठाकरे म्हणतात…

-अजित पवारांच्या अर्थसंकल्पात ही महत्त्वाची घोषणा; मनसेकडून जोरदार स्वागत