“गोपीचंद पडळकरांना संरक्षण द्या”, फडणवीसांची मागणी

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्यावरून भाजप आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता.

संजय राऊतांनी भाजपवर टीका करत असताना मोहित कंबोज यांच्यावर देखील निशाणा साधला होता. मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी करण्यात येत होती.

अशातच आता भाजपच्या सात आमदारांनी मोहित कंबोज यांना संरक्षण द्यावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं.

त्यावेळीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.

कसंय की मोहित कंबोजवर दाऊदसोबत साठगाठ करण्याचा आरोप नाहीये. उलट मोहित कंबोज यांनी त्यांते काळे कारनामे उघड केल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय, असं आमच्या अनेक लोकांंचं मत आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

तशा प्रकराच्या धमक्या देखील त्यांना मिळत आहेत. म्हणून ती मागणी भाजप आमदारांनी केली आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

राज्य सरकारची जबाबदारी आहे, जर आमच्या राज्यात राज्य सरकारच्या विरोधात बोल्यामुळे हल्ले होत असतील तर ते योग्य नाही, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

आपण पाहिलं की गोपीचंद पडळकर जर सरकारच्या विरोधात बोलत असतील तर त्यांना जीवे मारून टाकायचं आणि त्यांना साधी सुरक्षा देखील देयची नाही. त्यांना सुरक्षा देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

“अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही, ही लोकशाही आहे की तानाशाही?”

…नाहीतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

“तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही, माझे शब्द लिहून ठेवा” 

पुतिन याच्या हट्टामुळे रशियन उद्योगपतींना मोठा फटका; झालं इतकं नुकसान