“सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसप्रमाणे खासगी क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेसनाही सरकारने विम्याचं सुरक्षा कवच द्यायला हव्”

मुंबई | सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसप्रमाणे खासगी क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेसनाही केंद्र सरकारने विम्याचं सुरक्षा कवच दिलं पाहिजे, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेसाठी केंद्र सरकारने 128 कोटी रुपयांचा विम्याचा हप्ता भरला आहे. सरकारी रुग्णालयातील 22 लाख वैद्कीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ही रक्कम भरली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी खासगी क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेसनाही ही सुविधा द्यावी. त्यांनी काय घोडं मारलं आहे, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कोरोना संदर्भात निर्णय घेताना त्यात एकसमानता असली पाहिजे. सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेऊ नये, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्यासाठी त्यांनी रामविलास पासवान यांच्या निर्णयाचा दाखला दिला.

खादी ग्रामोद्योगच्या कर्मचाऱ्यांनचा एक महिन्यासाठी विमा काढण्याची घोषणा पासवान यांनी केली आहे. त्याचा काय उपयोग आहे, अशा सवंग लोकप्रियतेच्या घोषणा टाळल्या पाहिजेत, असं पासवान म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

-मी असं काही म्हणालोच नाही हवं तर…; रतन टाटा संतापले

-लॉकडाउन हटवण्याची घाई केली तर, कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल

-‘…तर हत्येचा गुन्हा दाखल करणार’; तबलिगीच्या सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

-राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

-“एखाद्या राज्यातून लॉकडाऊन हटवणं आणि एखाद्या राज्यात चालु ठेवणं योग्य नाही”