प्रसारभारतीकडून ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला इशारा; मुलाखत ठरली वादाचं कारण

नवी दिल्ली | चीनी राजदूत सून विडोंग यांची मुलाखत घेतल्यानं अडचणीत आलेल्या पीटीआय या वृत्तसंस्थेला आता प्रसार भारतीकडून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या मुलाखतीतून राष्ट्रविरोधी वार्तांकन केल्याचा ठपका ठेवत पीटीआयचं सबस्क्रिप्शनही रद्द करण्याचा निर्णय प्रसारभारती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चीनी राजदूत सून विडोंग यांची २५ जून रोजी पीटीआयने एक मुलाखत घेतली. गलवान खोऱ्यातील हिंसक झडपेसाठी सून यांनी या मुलाखतीतून भारताला जबाबदार धरलं. यामुळे राजदूतांची मुलाखत घेऊन राष्ट्रविरोधी कृत्य केल्याची नाराजी व्यक्त करत प्रसारभारतीने याआधीच पीटीआयला पत्र पाठवलं आहे.

पीटीआय प्रसार भारतीच्या नियंत्रणाखालील दूरदर्शन व आकाशवाणी या संस्थांनाही सेवा पूरवत आहे. तसेच प्रसारभारतीकडून पीटीआयला वर्षागणिक ६.७५ कोटी रूपयांची भरभक्कम वार्षिक वर्गणीही पुरवली जाते. मात्र आता या नव्या वादामुळे पीटीआयला आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, पीटीआय ही भारतातील सर्वात जुनी वृत्तसंस्था म्हणून ओळखली जात आहे. या घटनेवर चीनी राजदूतांच्या मुलाखतीची केवळ एक बाजूच चीनी दूतावासाकडून प्रसारित करण्यात आली आहे. असं पीटीआयचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“कोरोनाचे मृत्यू लपवायचेच असते तर…..” राजेश टोपे यांनी केला खुलासा

-ज्यांनी माझ्या शेतकऱ्याला फसवलं त्यांना हे सरकार शिक्षा करणारच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-काँग्रेसच्या ‘या’ माजी पंतप्रधानांचं नरेंद्र मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

-‘पडळकर…रात्रभर झोप येणार नाही अशा शिव्या देऊ’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा पडळकरांना दम

-आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनाला जाणार का?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले …