पुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…

पुणे | शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी, यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र शहरातील रूग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाहीये. दोन दिवसांपूर्वी चांगलीच घट पाहायला मिळाली होती. मात्र कालपासून परत कोरोना रूग्ण वाढताना दिसून येत आहेत. पुण्यात आज दिवसभरात 242 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे.

आज 1179 जणांच्या घशाचे स्त्राव चेकअपसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 242 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 6093 वर पोहचली आहे.

पुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 2340 एवढी आहे. तर आज दिवसरात 186 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत. तर दुर्देवाने आज 10 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्यात 166 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 45 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी

-पंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका!

-राज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली

-‘राज्याचा कारभार नागपुरातून चालवा’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ