अजित पवारांबर बैठकीला उपस्थीत असणाऱ्या पुण्याच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

पुणे | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुणे जिल्हात देखील कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे महानगरपालिकेने कडक नियमावली जाहीर केली आहे. तसेच ती नियमावली पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. महानगरपालिकेने सातत्याने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे.

अशातच पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेली वर्षभर सौरभ राव यांनी जिल्ह्याच्या हितासाठी कोरोना विरुद्ध अनेक नियमावलींची आखणी केली. तसेच त्यांनी गेली वर्षभर कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी रणनिती आखली. पण आज आखेर त्यांनाच कोरोनाची लागण झाली.

सौरभ राव यांची आज कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणी केल्यानंतर आज दुपारी सौरभ राव यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांचासोबत असलेले अनेक अधिकारी आता विलगीकरणात गेले आहेत. तसेच सौरभ राव हे शुक्रवारी  विधानभवनात झालेल्या बैठकीत अजित पवारांसोबत उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच पुणे शहरातील 6 हजार 500 पोलीसांना कोरोनाचा पहिला डोस यशस्वीरित्या देण्यात आला आहे. माञ पहिला डोस घेऊनही काही पोलीस अधिकाऱ्यांना परत कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

पुण्यात एकून  42 पोलीसांना कोरोनाची लागण झाली असून, पोलीस दलातील 16 पोलीस कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. वैद्यकीय तज्ञांच्या सल्लाने 26 पोलीस कर्मचारी घरीच उपचार घेत आहेत.

पुण्यात आत्तापर्यंत एकूण 2 लाख 19 हजार 285 कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण आकडेवारीचा विचार केला तर आज 2 लाख 2 हजार 339 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर काल पुण्यामध्ये 11 जणांचा कोरोनामुळे मृ.त्यू झाला आहे.

मृ.तांपैकी एकजण पुण्याबाहेरील असून सध्या 370 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच पुण्यात काल 15 मार्च रोजी दिवसभरात 678 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! आता पेट्रोल-डिझेलचे दर खाली येणार? निर्मला सीतारमण म्हणाल्या…

नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहून सं.तापली बायको, मग भररस्त्यात घडला ‘हा’ प्रकार

आनंद महिंद्रा यांनी लसीकरणासंदर्भात नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ मागणी

‘पुढील पाच वर्षात देणार एक लाख लोकांना नोकऱ्या,’ ‘या’ अभिनेत्यानं केली मोठी घोषणा

राज्यात पुढील काही दिवस हवामान खात्याकडून ‘या’ भागात पावसाचा इशारा