अस्सा पाहिजे महापौर… पुण्याच्या महापौरांच ‘या’ कृतीमुळे कौतुक

पुणे |  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुणेकरांशी संवाद साधला. या संवाद प्रक्रियेत तेच फक्त बोलत नव्हते तर पुणेकर त्यांना आपल्या अडीअडचणी सांगत होते आणि महापौर त्यांना आश्वस्त करत होते. यावेळी एका पुणेकराने अधिकारी लाच मागतोय, अशी तक्रार महापौरांकडे केली. त्यावर मी तुमची सर्वप्रथम माफी मागतो, असं म्हणत महापौरांनी त्या अधिकाऱ्यावर कारवाईचं देखील आश्वासन दिलं.

25 जानेवारीला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी फेसबुकच्या माध्यमातून ‘महापौर जनसंवाद’ या कार्यक्रमातून थेट पुणेकरांशी संवाद साधला. यावेळी टॅक्सच्या पावतीवरील नाव बदलून घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेतला अधिकारी लाच मागत आहे आणि त्यासाठी मी गेली 1 वर्ष महापालिकेत चकरा मारतोय, अशी तक्रार पुणेकर विजय शर्मा यांनी केली.

त्यावर सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो आणि दिलगीरी व्यक्त करतो. महानगरपालिकेतली कोणतीही व्यक्ती जर आपणाला असा जर मानसिक त्रास देत असेल तर मला माफ करा. तुम्ही आता बाकी काही न करता थेट माझ्याशी संपर्क साधा. आपली अडचण मी तात्काळ सोडवतो तसंच त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई देखील करतो, अशा शब्दात मोहोळ यांनी शर्मा यांना आश्वस्त केलं.

दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्याची चूक असताना देखील महापौर महोदयांनी स्वत: माफी मागितल्याने त्यांचा विनम्रपणा चर्चेचा विषय ठरतोय.

महत्त्वाच्या बातम्या-

-विराटभाई मी ‘हे’ सगळं तुझ्याकडून शिकलोय; धडाकेबाज खेळ करणाऱ्या श्रेयसची स्तुतीसुमनं

-ही’ योजना मराठवाड्यासाठीच आहे… रद्द केली तर रस्त्यावर उतरु; फडणवीसांनी ठाकरेंना ठणकावलं

-मला हिंदूहृदयसम्राट म्हणून म्हणू नका- राज ठाकरे

-भाजप-मनसे येणार एकत्र? भाजप आमदाराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

-आंध्र प्रदेशमधील जगन मोहन रेड्डी सरकारचा मोठा निर्णय!