पुणे महापौरांच्या पायाला भिंगरी, कंटेन्मेंट भागात प्रत्यक्ष भेटी देऊन उपाययोजनांचे नियोजन!

पुणे |   पुण्यात सुरूवातीपासूनच कोरोनाग्रस्तांची लक्षणीय संख्या आहे. अगदी मार्च महिन्यापासून ते आतापर्यंत दररोज नव्या कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद होत आहे. पण अशाही परिस्थितीत राज्य शासनाच्या सहकार्याने पुणे महानगरपालिकेचे काम अत्यंत चांगलं मानलं जात आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दररोज पुण्यातील विविध भागांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत तर उपाययोजनांचे नियोजन देखील करत आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयएएस अधिकारी सौरव राव यांच्या समवेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ढोले पाटील रोड, ताडीवाला रोड, संत गाडगेबाबा वसाहत कोरेगाव पार्क या कंटेंन्टमेंट एरियाची पाहणी केली. तसेच त्या भागातील स्वॅब कलेक्शन सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला.

कंटेंन्टमेंट परिसरातील ज्येष्ठ नागरिक, तसेच गंभीर आजाराची पार्श्वभूमी असणार्‍या नागरिकांची पालिकेकडून कोविड – 19 टेस्टिंग लॅब बसच्या माध्यमातून स्क्रीनिंग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. स्क्रीनिंगमध्ये लक्षणे आढळल्यास लगेच स्वॅब घेऊन पुढील उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे, त्याची ही प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पाहणी केली.

पुण्यात टेस्टच्या तुलनेत आता कोरोनाग्रस्तांचं प्रमाण घटलं आहे. दररोज टेस्ट कश्या पद्धतीने वाढवल्या जातील, यावर महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार काम करत आहे. त्यादृष्टीने पावलं टाकली जात आहेत. यामध्ये महापौर चांगलेच अ‌ॅक्टीव्ह असलेले पाहायला मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार- राजेश टोपे

-“जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच”

-प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न ठरला यशस्वी…!

-…म्हणून सोलापूर महापालिका आयुक्त दिपक तावरे यांची बदली, त्यांच्या जागी या अधिकाऱ्याची वर्णी

-लस शोधली तरी…. कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर