पुण्यातल्या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरणार, महापालिका उभारणार नवी घरं…

पुणे |  पुण्यातल्या झोपडपट्टया पाडण्याचा मोठा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पुणे शहर झोपडपट्टी मुक्त शहरं करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. महापालिका शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या शून्यावर आणून त्याजागी टुमदार घरं बांधणार आहे.

पुणे शहरात सध्या 568 झोपड्या आहेत. शहर जर झोपडपट्टीमुक्त झाले तर भविष्यात कोरोनासारख्या साथीला रोखण्यास मदत होणार आहे. यासाठी पुणे महापालिकेकडून ही उपाययोजना केली जात असल्याचं पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं.

पुण्यात पुन्हा कुणी झोपडपट्ट्या उभारु नये यासाठी झोपडपट्ट्या प्रतिबंधित कायदा आणणार असल्याची माहिती देखील आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. याशिवाय झोपडपट्ट्या पाडून त्याठिकाणी उभारल्या जाणाऱ्या टुमदार घरांच्या बांधकामासाठी उच्च तंत्रज्ञान वापरलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

पुणे महापालिका वर्षाला 75 हजार ते 1 लाख चौरस फूट बांधकाम करणार आहे. यासाठी मोकळ्या जागांचा शोध घेणे, त्यावरील अतिक्रमण, झोपडपट्ट्यांची संख्या आणि तेथील घरांची पाहणी करुन कार्यवाही केली जाणार आहे. या कामासाठी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-वर्षभरापासून देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे- संजय राऊत

-‘…हे पत्र एकदा नक्की वाचाच’; प्रियंका गांधींची नरेंद्र मोदींना विनंती

-उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत त्यामुळे मी त्यांना…-देवेंद्र फडणवीस

-“राहुल गांधी यांना कोणीच गांभीर्याने घेत नाही”

-राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार- राजेश टोपे