पुणे विभागात सलून सुरु करण्यास परवानगी; ‘या’ नियमांचं पालन करणं बंधनकारक

पुणे | राज्य सरकारने 28 जूनपासून सलून सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील आणि त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लागणार आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विशिष्ट अटी शर्तीच्या अधीन राहून सलून सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी अटी आणि शर्तींच्या अधीन परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं. 28 जून पासून पुढील आदेशापर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत चालू ठेवण्यास जिल्हाधिकारी राम यांनी दिली परवानगी.

केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग याच मर्यादित सेवा ग्राहकांना देता येतील. त्वचेशी संबंधित इतर कृती करण्यासाठी सध्या संमती देण्यात आलेली नाही. तसेच दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षित साधनांचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.

फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही अशी वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइज करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांतच्या आत्महत्येनंतर झालेल्या ट्रोलिंगनंतर आता करण जोहरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-‘ही राजकारणाची वेळ नाही’; शरद पवारांचा काँग्रेसला टोला

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नगरसेवकाने गोपीचंद पडळकरांना बाईकवरुन शहरभर फिरवलं

-सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांचा चाहत्यांसाठी मोठा निर्णय

-संत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पादुका एस.टी. बसमधून पंढरपूरला जाणार