पुणे | पुण्याचा कोरोनाबाधितांचा आकडा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज्यातल्या इतर ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना पुण्याच्या काही भागातले निर्बंध कडक करण्यात आले आहेत. आज पुण्याच्या कटेंनमेंट झोनमध्ये एका परिसराची भर पडली.
आज एकाच दिवशी 19 कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने पुण्यातील आणखी एक परिसर कंटेनमेंट घोषित करण्यात आला आहे. कोरेगाव पार्कमधील संत गाडगे बाबा वस्ती भागात एकाच दिवसांत 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
या भागांत एकाच दिवशी इतक्या रूग्णांची भर पडल्याने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने अधिकारी सौरव राव यांच्यासोबत परिसराची पाहणी केली. पाहणीनंतर हा भाग कंटेन्मेंट घोषित करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
दुसरीकडे पुण्यात संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 31 मे पर्यंत ही संचारबंदी असणार आहे. सरकारी आदेशानुसार संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत पुणे शहर आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
-आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका
-“…तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 36 ते 70 लाखांवर गेली असती”
-निधीची गरज लागल्यास मागणी करा, तात्काळ देतो; अजितदादांचा पुणे महापौरांना शब्द
-अम्फान वादळाचा फटका, पंतप्रधानांकडून पश्चिम बंगालसाठी ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर
-खासगी रुग्णालयात होणारी रुग्णांची लूटमार थांबवण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय