“अवाढव्य पुतळे उभारण्यापेक्षा माॅडर्न शाळा विद्यालयं उभी करा”

नवी दिल्ली | सरकारने राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे मोठे पुतळे उभारण्याऐवजी आधुनिक शाळा आणि विद्यापीठं उभी केली पाहिजेत, असं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.

हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवणार नाही, तर भारताला आर्थिक विकासाच्या मार्गावरुन भरकटवण्याचं काम करेल, असं म्हणत रघुराम राजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

भारताची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली असून अर्थव्यवस्थेत आजाराची लक्षणं दिसू लागली आहेत. अशा अवस्थेत पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचे केंद्रीकरण आणि अधिकारहीन मंत्री ही स्थिती अर्थव्यवस्थेसाठी अपायकारक आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, सध्याच्या सरकारच्या सर्व योजना, निर्णय, यांचं केंद्रीकरण झालं आहे. तसेच जे काही सरकारी पातळीवरील निर्णय घेतले जातात ते पंतप्रधान कार्यालयातील काही व्यक्ती घेतात, असंही राजन यांनी म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या –