Top news देश

गरीबांच्या खात्यात साडे सात हजार रूपये जमा करा; राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली |  50 टक्के गरीबांच्या खात्यात प्रत्येकी साडे सात हजार रूपये जमा करावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसंच छोट्या व्यापाऱ्यांना तात्काळ मोठं पॅकेज देण्याची गरज देखील त्यांनी बोलून दाखवली.

केंद्र सरकारने NYAY योजनेची संकल्पना घेऊन भारतातील 50% गरीब कुटुंबांच्या खात्यात थेट पैसे देणे सुरू करावे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. तसंच स्थलांतरीत कामगार, गरीब, लघु व मध्यम उद्योजकांनागांना आज आर्थिक मदतीची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारने मदत न केल्यास बेरोजगारीची त्सुनामी येईल. यासाठी ठोस रणनितीची आवश्यक्ता आहे. यासंदर्भात कॉंग्रेस पक्ष सरकारला मदत करण्यास पूर्णपणे तयार आहे, असंही ते म्हणाले.

या लॉकडाऊनमुळे ज्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यांना आधार दिल्याशिवाय आपण पुढची पावले उचलू शकत नाही. भाजप सरकारने त्यांच्या कामात पारदर्शकता बाळगण्याची गरज आहे. लॉकडाऊन उघडण्यासाठी मापदंड निश्चीत करण्याची गरज आहे. सरकार यासंदर्भात जी पावलं उचलत आहे त्याची माहिती नागरिकांना देणे गरजेचे आहे, असंही ते म्हणाले.

भारतीय अर्थव्यवस्था थांबली आहे, व्यवसाय ढासळत आहेत. आपल्याला बाजारात तातडीने मागणी निर्माण करण्याची गरज आहे. ही प्रणाली सुरू करण्याची आवश्यकता आहे, तसे न झाल्यास मोठी आपत्ती निर्माण होईल, अशी भिती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

लघु व मध्यम उद्योगांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा, थेट गरिबांच्या खात्यात पैसे जमा करणे, स्थलांतरीत मजुरांच्या प्रवासासाठी धोरण तसेच लॉकडाउन उघडण्यासाठी योग्य तयारी सुरू करणे अशा महत्वाच्या गोष्टींसाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-पदवी, पदव्युत्तर परीक्षांबाबत उदय सामंतांचा मोठा निर्णय, वाचा कुणाच्या होणार परीक्षा अन् कुणाच्या नाही…!

-दिग्गजांना बाजूला सारत भाजपने विधानपरिषदेसाठी 4 उमेदवार केले जाहीर!

-सध्याच्या मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढलंय, म्हणून त्यांना काही फरक पडत नाही- निलेश राणे

-जितेंद्र आव्हाडांनी केली कोरोनावर मात

-आज आहे नारद जयंती; जाणून घ्या नारदाच्या जन्माची कथा आणि पूजेचं महत्त्व