काँग्रेस मुख्यालयात आता राहुल गांधींसाठी स्वतंत्र कक्षही नाही!

नवी दिल्ली | दिल्लीतल्या 24 अकबर रोडवर काँग्रेसचं मुख्यालय आहे. त्यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी आता स्वतंत्र कक्षही नाही. काँग्रेसच्या या मुख्यालयात सोनिया गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींसाठी स्वतंत्र कक्ष आहेत.

आता ज्या नेत्यांना राहुल गांधींना भेटायचं असेल ते त्यांच्या 10 जनपथ निवासस्थानीच त्यांना भेटतात. राहुल गांधींच्या घरीच प्रियांका गांधीही लोकांच्या भेटीगाठी घेतात.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता तर ते काँग्रेसच्या बैठकीतही उपस्थित नव्हते. ज्या बैठकीत राहुल गांधी नाहीत अशी काँग्रेसची ही पहिलीच बैठक होती.

सोनिया गांधींनी पक्षाचे महासचिव, राज्याचे प्रभारी, विधिमंडळ पक्षाचे नेते या सगळ्यांची बैठक बोलवली होती पण राहुल गांधी कोणत्याच पदावर नसल्याने ते बैठकीला आले नाहीत. राहुल गांधी आता काँग्रेसचे फक्त सदस्य आणि वायनाडचे खासदार आहेत.

राहुल गांधींनी याआधी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही मिनिटांसाठी सहभाग घेतला होता. याच बैठकीत त्यांचा राजीनामा घेतला गेला आणि सोनिया गांधींची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली. 

महत्वाच्या बातम्या-