काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नाही. शिष्टमंडळासोबत गेलेल्या पत्रकारांना वाईट वागणूक देण्यात आली आहे. त्यांना मारहाण देखील करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरुनच माघारी पाठवून देण्यात आलं. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे आरोप केले आहेत.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली गेलेल्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळाबाहेर येण्यास परवानगी नाकारण्यात आली. श्रीनगर विमानतळावर उतरल्यानंतर तासाभरातच या शिष्टमंडळाला दिल्लीला माघारी पाठवून देण्यात आलं.

दरम्यान, शिष्टमंडळाला काश्मीरमधल्या जनतेला नेमक्या कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय ते जाणून घ्यायचे होते. पण आम्हाला विमानतळाबाहेर येऊ दिले नाही, असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-