संकटाच्या काळात राजदेखील मला फोन करतोय- उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेशी आज पुन्हा एकदा संवाद साधला. कोरोनाच्या लढाईत सगळेच एकदिलाने उतरल्याचं समाधान आहे. महाविकास आघाडीबरोबरच विरोधी पक्ष तसंच राज देखील मला फोन करून सूचना देतो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संपूर्ण जग सध्या करोनाशी दोन हात करत आहे. कुणीही कुणाच्या मदतीला येऊ शकत नाही. मात्र, महाराष्ट्राला जो काही वेळ मिळाला त्यात आपण आवश्यक ती पावलं उचलल्याचं उद्धव यांनी सांगितलं.

राज्यातून होत असलेल्या स्थलांतरावर उद्धव ठाकरे म्हणाले, कुठेही जाऊ नका. काळजी करून नका. राज्य सरकारनं तुमची जबाबदारी घेतली आहे. अडकलेल्या सगळ्यांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. जशी माहिती मिळत आहे. तशा उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे कुणीही कुठेही जाऊ नका.

नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून 24 तास ही दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, तरीही गर्दी दिसत आहे. ती थांबवा अन्यथा सरकारला कठोर पाऊलं उचलावी लागतील, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.

महत्वाच्या बातम्या –

-श्रीमंत मनाचा बळीराजा; 3 एकर जमिनीपैकी 1 एकर गहू गरजूंसाठी देणार

-‘गरीब शेतकऱ्याच्या श्रीमंत मनाचं’ बाळासाहेब थोरातांकडून कौतुक, म्हणाले ‘आम्हाला आपला सार्थ अभिमान!’

-कोरोनाचा संकट जाईपर्यंत शिवभोजन थाळी 5 रूपयांना; मंत्री छगन भुजबळांची घोषणा

-चांगली बातमी! या दोन देशांनी कोरोनावर शोधली लस

-लॉकडाऊनसारख्या कठोर निर्णयांबाबत देशाची माफी मागतो- पंतप्रधान