“मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही; त्यांच्या मोर्चाला मी मोर्चानेच उत्तर दिलं आहे”

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन निघालेल्या मोर्चावर टीका केली आहे. मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागला नाही, असं ते म्हणाले आहेत.

मोर्चाला उत्तर मी मोर्चानेच दिलं आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना बाहेर हाकला ही आमची मागणी आहे. ज्यांना कायद्याचे पूर्ण ज्ञान नाही असे लोकही या कायद्याबाबत बोलताना दिसतात, असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली.

भारत हा काही धर्मशाळा नाही. कोणीही यावं आणि इथे रहावं. घुसखोरांना बाहेर हाकलंच पाहिजे. घुसखोरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

पाकमधल्या हिंदूंवर अत्याचार होतात. त्यामुळे सीएएला विरोध करण्यात काही अर्थ नाही. 1955 पासून नागरिकत्व देण्याबाबत कायदा आहे, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सरकारमधून बाहेर पडा म्हणणाऱ्या अब्दूल सत्तारांना बच्चू कडूंचं जोरदार प्रत्युत्तर

-महात्मा गांधींचा पुतळा पडलेल्या अवस्थेत आढळला; या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण

-…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल- राजू शेट्टी

-“केजरीवालांचा पराभव होणार, असं झालं नाही तर…”

-उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोक्का लावा- अजित पवार