राज ठाकरे-शरद पवार बैठकीत काय झालं?; आली ‘ही’ माहिती समोर

मुंबई | राज्यातील बहुतांश सर्व बस आगारातील वाहतूक सध्या ठप्प आहे. अपु्ऱ्या सोईसुविधा, पगाराची अनियमितता आणि सरकारी विलीनीकरण या मागण्यांसाठी एसटी कामगार सध्या राज्यभर आंदोलन करत आहेत.

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कराव्यात यासाठी संप पुकारला आहे. मात्र, त्याला ठाकरे सरकारने नकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता चिघळलेलं दिसत आहे.

अशातच एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली. त्यानंतर राज ठाकरे यांनी नेतृत्व करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं.

त्यानंतर आता राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली आहे. सिल्वर ओकवर या दोन्ही नेत्यांची भेट झाली.

या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर गंभीर चर्चा झाली. या बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार यांच्या कानावर घातलं आहेत. इतर महामंडळांप्रमाणे सातवा वेतन एसटी महामंडळाला लागू करण्याची मागणी केल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

केवळ एसटी प्रश्नावर चर्चा झाली आहे. शरद पवार तोडगा काढतील अशी अपेक्षा देखील बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.

सध्या मुख्यमंत्री यांची सर्जरी झाल्यामुळे राज ठाकरे शरद पवारांना भेटले आहेत. फायनान्सचा विषय असल्यानं पवारांना भेटलोय, असंही नांदगावकर म्हणाले आहेत.

राज ठाकरे आणि शरद पवार दोघेही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटतील, अशी माहिती देखील बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

शरद पवारांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. प्रत्येकवेळी लोकांनी राज ठाकरेंना भेटायला हवं का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“ठाकरे सरकार छत्रपतींची नाही तर पाकिस्तानची औलाद”

‘हिंदुत्व म्हणजे मुस्लीम किंवा…’; राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ मुद्द्यावर होणार गंभीर चर्चा

 “फुट पाडण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गाठ नितेश राणेशी आहे”

“नवाब मलिक हा गद्दार, त्याला पाकिस्तानला पाठवा”