राज ठाकरेंचा मनसेसैनिकांना नवा आदेश, म्हणाले…

मुंबई | राज्याच्या राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सभेमुळं जोरदार वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरेंनी आता आक्रमक हिंदूत्वाचा मार्ग अवलंबल्याची सर्वत्र चर्चा आहे.

गेल्या दोन महिन्यात राज ठाकरेंनी तीन मोठ्या जाहीर सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढवल्या आहेत.

राज ठाकरेंनी मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये सभा घेत मशीदींवरील भोंगे उतरवण्याबाबत ठाकरे सरकारला परत एकदा अल्टिमेटम दिला आहे.

4 तारखेपर्यंत सर्व मशींदींवरी भोंगे उतरवण्यात यावेत अन्यथा परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी सरकारनं ठेवावी असं राज ठाकरे म्हणाले होते.

राज ठाकरेंनी आता आपल्या मनसेसैनिकांना एक महत्त्वाचा सल्ला आणि आदेश दिला आहे. रमजान ईद हा सण सर्वत्र साजरा होणार असल्यानं सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

आधी ठरल्याप्रमाणं अक्षय तृतीयेला कसल्याही प्रकारच्या आरत्या करण्यात येवू नयेत, असंही राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमधील पत्रात म्हटलं आहे.

भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे त्याबाबत उद्या मी नेमकं काय करायचं हे ट्विटरद्वारे आपणा सर्वांना सांगेन, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “इथं कोणाची हुकुमशाही चालणार नाही, मग तो कोणीही असो”

राज ठाकरेंवर कारवाई होणार?, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य 

“उद्धव ठाकरे होते म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते” 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी 

पुतिन यांना झालाय गंभीर आजार; तब्येतीमुळे ‘हा’ मोठा निर्णय घेणार?