“हिंदूमध्ये फूट पाडण्याचं काम सुरू, त्यांचे भोंगे त्यांच्यावरच उलटणार”

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवत भाजपने महाराष्ट्रात हिंदूचा गळा घोटला आहे. 2005 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असून मनसे सारख्या पक्षाला पुढे करून विषय चर्चेत आणण्यात आलेला आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला आहे, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली आहे.

राज ठाकरेंच्या निर्णयाने हिंदू नाराज झाले आहेत. हिंदूमध्ये फुट पाडण्याचं काम सुरू आहे. त्यांचे भोंगे त्यांच्यावरच उलटणार आहेत आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. येणाऱ्या निवडणूकीसाठी आम्ही सज्ज आहोत. हिंदूंसाठी आजचा दिवस काळा मानला जात आहे, असंही राऊत म्हणाले.

आज सकाळपासून आमच्याकडे हजारो लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. शिर्डी, त्र्यंबकेश्वरमधील महाआरत्या बंद झाल्या आहेत. भाजपने आपल्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा बळी घेतला आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आहे.

त्यामुळे आता हिंदूच रस्त्यावर उतरले तर मला आश्चर्य वाटणार नाही. आम्ही, आवाहन करतोय की, हिंदूंनी संयम राखावा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, हिंदूमध्ये फुट पाडण्याचे काम सुरू असून हिंदूमध्ये संताप आहे. राज ठाकरेंचा विषय सामाजिक नसून धार्मिक आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मला दंगल भडकवायची असती तर…’; राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

“1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढलो असेल”

अडीच वर्षे तुम्ही काय केलं? पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

“भोंगेंबाज राजकारण्यांनी आज हिंदूत्त्वाचा सुद्धा गळा घोटला”

मोठी बातमी! ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका