राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना दिलं हे आव्हान; चंद्रकांत पाटील स्विकारणार का??

औरंगाबाद | विधानसभा निवडणुकीचं घोडं मैदान अगदी जवळ आहे. याच मैदानात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उतरावं. त्यांच्या विरोधात मी शड्डू ठोकायला तयार आहे, असं आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाटील यांना दिलं आहे. राजू शेट्टी औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारचा जोरदार समाचार घेतला.

चंद्रकांत पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. याच पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी हे आव्हान दिलं आहे.

चंद्रकांत पाटील आणि राजू शेट्टी हे एकेकाळचे जवळचे मित्र. मात्र शेट्टींनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मग शेट्टींना शह देण्यासाठी पाटील यांनी शेट्टींचे विरोधक सदाभाऊ खोत यांना पाठबळ देण्यास सुरूवात केली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींचा सेनेचे उमेदवार धैर्यशील मानेंनी धक्कादायकरित्या पराभव केला. लोकसभेचा पराभव झाल्यापासून शेट्टी राज्य सरकारविरोधात आणखीनच आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, मला कोणत्याही महत्वकांक्षा नाहीयेत, असं पाटील म्हणाले आहेत. राजू शेट्टींच्या आव्हानाला चंद्रकांत पाटील काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-