26 मार्चला होणारी राज्यसभेची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली

नवी दिल्ली | राज्यसभेची द्वैवार्षिक निवडणूक लांबणीवर पडली आहे. 26 मार्चला होणारी राज्यसभेची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात ही निवडणूक बिनविरोध झाल्याने प्रश्न नाही पण गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

दरम्यान, कोरोनामुळे राज्यसभेची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली असली तरी नवीन तारखांची अद्याप घोषणा करण्यात आली नाही.

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता पुन्हा संबोधित करणार; काय घोषणा करणार??

-कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलं तीन महिन्यांचं वेतन

-महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली

-चिंताजनक | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार; पुण्यात आणखी 3 रुग्ण पॉझिटिव्ह

-शाहीनबाग आंदोलनावर अखेर पोलिसांची कारवाई; सर्व आंदोलकांना हटवलं