मुंबई | बिग बॉसच्या (Bigg Boss 15) घरातून बाहेर पडल्यानंतर कॉन्ट्रव्हर्सी किंग बिचुकले याने बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या ( Salman khan) विरोधात संताप व्यक्त केला आहे.
असले 100 सलमान मी गल्ली झाडायला उभे करेन. दुसरं कुणी मोठं होत असेल तर ते सलमानला बघवत नाही, असं बिचुकले म्हणाले आहेत. सलमान खान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे, असा संताप बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिचकुलेनी व्यक्त केला आहे.
सलमानला वाटतं की तो शो चालवतो पण तसं नाहीये. बिग बॉसचा 15 वा सिझन मी चालवला. काल वाघ पिंजऱ्यात होता आणि तो हंटर फिरवत होता. आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे, असं त्याने म्हटलं होतं.
सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईल की मी काय आहे, असं म्हणत बिचुकलेनी सलमानवर निशाणा साधलाय. सलमानवर टीका करणाऱ्या बिचुकलेला राखी सावंतने झापलं आहे.
राखी सावंतने अभिजीत बिचकुलेवर (abhijeet bichukale) जोरदार शाब्दिक हल्ला केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राखी म्हणते की अभिजीतने समाधी घेतली आहे. सलमानबाबत (salman khan) वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राखी सावंतने त्याला फटकारलं आहे.
अभिजीत बिचुकले याला राखी सांवतने सुनावल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये राखी सावंत पति रितेश सिंह सोबत दिसत आहे.
राखीने आपला अनोखा ड्रेस घातला असून बिग बॉसच्या अंतिम कार्यक्रमात ती पतीसोबत दिसणार आहे. लग्नानंतर दोघांच्यामध्ये अनेक वाद झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
Omicron विषाणू कितीकाळ जीवंत राहू शकतो?, अभ्यासातून महत्त्वाची माहिती आली समोर
पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा
लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना…- संभाजी भिडे
श्रीमंत पक्ष ठरलेल्या भाजपकडे आहे इतकी संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल
पोस्टाची बंपर योजना; महिन्याला गुंतवणूक करून मिळवा 35 लाख रुपये