खासदार उदयनराजे यांना लोकसभेचं तिकीट मिळणार का नाही? या बद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उदयनराजेंना आॅफर दिली आहे.
खासदार उदयनराजे यांना साताऱ्यातून लोकसभेसाठी तिकीट मिळणं अवघड आहे, त्यामुळे त्यांनी माझ्या रिपब्लीकन पार्टीत यावं, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.
दरम्यान, साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक कोण लढणार याबाबत अद्याप शरद पवारांनी घोषणा केलेली नाही, त्यामुळे आठवलेंच्या या आॅफरला उदयनराजे काय प्रत्युत्तर देतायेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.