विधानसभा निवडणुकीआधी भाजपने राणेंना दिला जोरदार धक्का! राणेंसाठी हा धडा??

सिंधुदुर्ग |  मातब्बर नेते नारायण राणेंनी शिवसेना सोडली अन् संघर्ष चालू झाला राणे -शिवसेना यांच्यातला. हा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला. पहिल्यांदा शिवसेना… नंतर काँग्रेस आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपला त्यांनी जवळ केलं. पण त्याच भाजपने लोकसभेच्या तोंडावर शिवसेनाला कवटाळलं आणि राणेंना दूर सारलं.

नारायण राणेंचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी बांधकाम उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून धक्काबुक्की केली आहे. अधिकाऱ्याला हीन दर्जाची वागणूक देत त्यांनी त्या अधिकाऱ्याचा अपमान केला. साहजिकच शिवसेनेच्या हातात आयतं कोलित मिळालं. गृहराज्यमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी राणेंच्या विरोधात कडक कारवाई करत त्यांना जबरदस्त दणका दिला.

कणकवली पोलिसांनी नितेश राणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्य़ावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

भाजपने संधीसाधू राजकारण साधलं???

कोकणात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचप्रमाणे नारायण राणेंना मानणारा वर्ग देखील मोठा आहे. राणेंच्या मदतीने मुख्यमंत्र्यांना शिवसेनेची ताकद कमी करून कोकणात भाजपचं जाळं पसरवायचं होतं. मात्र पाठीमागच्या काळात राणेंच्या राजकिय कारकिर्दीला ग्रहण लागलं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निलेश राणे यांचा पराभव तर झालाच पण खुद्द राणेंचं वजन देखील कमी झालं आणि पर्यायाने मुख्यमंत्र्यांचं शिवसेनेची ताकद कमी करण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं. इकडे लोकसभेच्या अगोदर भाजपाविरोधी वातावरण तयार होत असताना काळाची पावलं ओळखून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेना जवळ केलं. आणि त्याचाच परिपाक म्हणून की काय राणे पुत्रावर गुन्हा दाखल होऊन नितेश यांना जेलची हवा खावी लागली.

चंद्रकांत पाटील यांनी घेतली पिडित शेडेकर कुटुंबांची भेट-

घडलेल्या प्रकरणाने शेडेकर यांच्या कुटुंबाला जबर धक्का बसला होता. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिडित कुटुंबांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांनी पिडित कुटुंबाचं सांत्वन करून राज्य सरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, काळजी नसावी, असं आश्वासन दिलं. पाटलांनी खेडेकरांच्या कुटुंबाची भेट घेणं हे राणेंसाठी धक्कादायक होतं.

नारायण राणेंना मागावी लागली माफी-

नितेशचं हे वागणं चुकलेलं आहे, असं म्हणत त्यांनी नितेशचे कान उपटले. आणि त्याच्यावतीने मी माफी मागतो, असं ते म्हणाले.

हे सगळं असं राजकारण रंगलेलं असताना आता नारायण राणे काय पाऊल उचलणार? विधानसभेच्या तोंडावर काय रणनिती आखणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.