सॅल्यूट… आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!

मुंबई |  कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे मात्र कोरोनाला पळवण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनांसाठी समाजातले दानशूर देखील पुढे येऊ लागले आहेत. आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांनी आत्तापर्यंतची सर्वांत मोठी मदत केली आहे. आधी 500 कोटींची मदत त्यांनी जाहीर केली होती. मात्र आता आणखी 1 हजार कोटींची मदत त्यांनी जाहीर केली आहे. रतन टाटांनी आतापर्यंत दीड हजार कोटींची मदत केली आहे.

कोरोना आजारामुळं सध्याची भारतातील आणि जगाची परिस्थिती ही खूपच वाईट झाली आहे. त्यासाठी आपल्याकडून सर्वात चांगली कृती करण्याची हीच वेळ आहे, असं म्हणत टाटा ग्रुपने आणखी 1 हजार कोटी रूपये मदत म्हणून देत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

आता काळाची गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच वेळ असल्याचं टाटा यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय उपकरणं आणि वैद्यकीय क्षेत्रांतील महत्त्वाच्या खरेदी यांसाठी टाटा ग्रुपकडून ही मदत दिली गेली आहे. काही तासांपूर्वी त्यासाठी रतन टाटांनी 500 कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. मात्र आता त्यांनी आणखी 1 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, साई मंदिराने 50 कोटी रूपये, मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिराने 50 कोटी रूपये तर अंबाबाई मंदिराने देखील 2 कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा  केली आहे. दुसरीकडे अनेक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. आपापल्या परीने अनेक संस्था, व्यक्ती कोरोनाच्या लढाईत आपलं योगदान देत आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या –

-सच्चा प्रेमवीर… कोरोनाचं संकट असताना हजारो कि.मी. प्रवास करून प्रेयसीला केलं प्रपोज!

-नरेंद्र मोदींचं आर्थिक मदतीचं आवाहन; एका तासाच्या आत अक्षय कुमारची 25 कोटींची मदत!

-देशसेवेची हीच वेळ… दानशूर रतन टाटांनी केली 500 कोटींची मदत

-नारीला सलाम…. प्रथम कोरोना तपासणीचं किट बनवलं अन् नंतर बाळाला जन्म दिला!

-‘पोटासाठी नाचते’ म्हणणाऱ्या नृत्यांगणांवर उपासमारीची वेळ; मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची विनंती